मुल:- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांना स्थानिक पातळीवर धक्का बसला आहे. मुल नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि दीर्घकाळ अहिर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रशांत समर्थ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत आमदार विजय वडेट्टीवार व प्रदेश सरचिटणीस संतोष रावत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. Congress Entry
प्रशांत समर्थ हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. हंसराज अहिर यांचे निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळखले जायचे मात्र अलिकडच्या काळात नेमकं काय झालं. हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. BJP MUL
मुल नगरपालिकेतील आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकीचे सूत्रधार आ. सुधीर मुनगंटीवार असणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या विजयाच्या समीकरणाला गालबोट लावण्यासाठी हा प्रवेश घडवून आणण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. प्रवेशामागील खरा राजकीय हेतू काय, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. Prashant samarth
दरम्यान, प्रशांत समर्थ यांच्या जाण्यामुळे भाजपाच्या संघटनात्मक रचनेवर फारसा परिणाम होणार नाही, असं स्थानिक स्तरावर मानलं जात आहे. उलट, त्यांच्या जाण्यामुळे भाजपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचंही चित्र दिसत आहे. काही कार्यकर्त्यांनी “संघटना स्वच्छ होत आहे” अशी भावना व्यक्त केली आहे. Hansraj ahir
मात्र, समर्थ यांच्या स्थानिक संपर्कामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय वातावरणात थोडी हालचाल निर्माण झाली आहे. ही घडामोड हंसराज अहीर यांच्या व्यक्तिगत प्रभावाला लागलेला धक्का म्हणून पाहिली जात आहे. Sudhir mungantiwar


