चंद्रपूर:- शहरातील सर्वात गजबजलेल्या जटपुरा गेट परिसरातील डॉ. मुंधडा यांच्या दवाखान्यात भरवस्तीत चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी धाडस दाखवत दवाखान्यातून १ लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, आता चोरट्यांनी डॉक्टरांच्या क्लिनिकला लक्ष केले आहे. जटपुरा गेट जवळ असलेल्या डॉ. मुंधडा यांच्या दवाखान्यात मध्यरात्री दोन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला. दवाखान्याचे कुलूप तोडून या चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि अत्यंत चालाखीने १ लाख रुपयांची रोकड आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज चोरून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन युवक स्पष्टपणे दिसून येत आहेत. मध्यरात्रीच्या शांततेचा फायदा घेत या तरुणांनी ही चोरी केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


