राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू च्या वक्तव्याचा निषेध.

जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा देण्यापासून  मज्जाव केल्याचा आरोप.
Bhairav Diwase.    July 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभूर्णा:- जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा देण्यापासून उदयन राजे भोसले यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना रोखण्याचा प्रयत्न केले.यामुळे शिवछत्रपतींचा व  महाराष्‍ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका पोंभूर्णा तर्फे आम्ही शिवप्रेमी आहोत, हा अन्याय खपवून घेणार नाही असे म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा निषेध नोंदविला. यावेळी आपण केलेल्या कृतीचा निषेध करित असल्याचे पत्र डाकेद्वारा पाठविले.
    यावेळी जिल्हा सचिव रुषी हेपट, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सोनल मडावी, तालुकाध्यक्ष  विजय ढोंगे,  कार्याध्यक्ष हिराजी पावडे,   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जवाहर धोडरे, शहर अध्यक्ष गुरुदेव मडावी, माजी सरपंच सुनिल दिवसे, माजी सचिव विजय मानकर, अमिन मेश्राम, राजू झाडे, विनोद मडावी, सुनील निमसरकार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या