Top News

चिमूर तालुक्यातील कोळसा खदानींना मंजुरी द्या:- खा. अशोक नेते.

खासदार अशोक नेते यांची केंद्रीय कोळसा, खाण मंत्री प्रल्हादजी जोशी यांच्याशी  चर्चा.
Bhairav Diwase.    July 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील बंदर गावातील मंजूर कोळसा खदान पूर्ववत सुरू करून अन्य 3 कोळसा खदानीना मंजुरी देण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय कोळसा खाण मंत्री मा श्री प्रल्हादजी जोशी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

   खासदार अशोक नेते यांनी   दिल्ली येथे केंद्रीय कोळसा, खाण मंत्री श्री प्रल्हादजी जोशी यांची भेट घेतली व चिमुर तालुक्यातील सर्वेक्षण झालेल्या 3 कोळसा खानीना मंजुरी मिळण्याबाबत मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा केली.
      यावेळी मंत्री महोदयांशी बोलताना खासदार अशोक नेते यांनी सांगितले कि, क्रांतीभूमी असलेल्या चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्याच्या बंदर येथे असलेल्या कोळसा खदानित खाण काम सुरू होते मात्र काही कारणास्तव खाण काम बंद करण्यात आल्याने मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर खाण त्वरीत सुरू करून  मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तसेच वेकोली अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील माजरा, भांसुली, पित्रीचुवा या 3 सर्वेक्षण झालेल्या कोळसा खदानीना तात्काळ मंजुरी देऊन खाण काम सुरू करण्याची मागणी खास. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री श्री प्रल्हादजी जोशी यांच्याकडे केली आहे.
     सदर तिन्ही ठिकाणी चांगल्या प्रतीचा कोळसा उपलब्ध असल्याने चिमूर या क्रांतिकारकांच्या पावन भूमित रोजगार निर्मिती होईल तथा या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊन मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही मिटेल असेही खासदार अशोक नेते यांनी मंत्री महोदयांना सांगितले. यावेळी मंत्री महोदयांनी कोळसा खाणीना मंजुरी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने