२४४ कोरोनातून बरे ; १५९ वर उपचार सुरु.
Bhairav Diwase. July 26, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शनिवारची ३९६ संख्या रविवारी सायंकाळ पर्यंत ४०३ वर पोहोचली आहे.
जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४४ झाली असून गेल्या चोवीस तासात आज २४ बाधितांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १५९ बाधितावर उपचार सुरू आहे.
जिल्ह्याचा डब्लिंग रेट सध्या १५.३ आहे.आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०२ रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती,ब्रह्मपुरी, कोरपना, नागभिड, गडचांदूर या शहरांमध्ये १४० रूग्ण आढळून आलेले आहे. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या १५५ आहे.