डायरेक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी अर्ध्या एकर शेतीत केला प्रयोग.

शेतकऱ्यांनी डायरेक्ट पॅडीसिडर यंत्र किरायाने आणले व या यंत्राद्वारे पेरीव धानाची पेरणी.
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पाेंभुर्णा:- भातपिकातील खर्च कमी करता यावा, शेतमजूरी कमी करता यावी यासाठी कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही अंतर्गत डायरेक्ट पॅडीसीडर यंत्राचे सहाय्याने भात राेवणी करण्यासाठी प्रसार प्रचार करण्यात आले. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संजीवनी कृषि सप्ताह कार्यक्रमातून डायरेक्टर पॅडीसिडरची माहिती पटवून दिले. 
याची उपयुक्तता पटल्याने आनंदराव बावणे या शेतकऱ्यांनी चेक हत्तीबाेडी येथील आपल्या अर्ध्या एकर शेतीत हा प्रयोग सुरू केला आहे . या शेतकऱ्यांनी डायरेक्ट पॅडीसिडर यंत्र किरायाने आणले व या यंत्राद्वारे पेरीव धानाची पेरणी केली आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व अन्न सुरक्षा दलाचे प्रशिक्षकांनी यात सहकार्य केले.
डायरेक्ट पॅडीसीडर वापरतांना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे सुध्दा व्यवस्थापण करता येते. तसेच ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करता येते.

डायरेक्ट पॅडीसिडरमुळे मजुरांवरील खर्च कमी होतो. रोवणी करीता रोपे तयार करणे, रोपे काढणे, मुख्य शेतात पसरविणे व रोवणी करणे इत्यादी कामावरील हे. रू.6 हजार 300 खर्चात बचत होते. बी सारखे पेरले जाते व हेक्टरी झाडांची संख्या योग्य राखली जाते.
हेक्टरीबियाणे व विरळणीचे खर्चात बचत होते.पीक रोवणी केलेल्या धानापेक्षा डायरेक्ट पॅडीसिडरणे पेरणी केलेले पीक 7 ते 10 दिवस लवकर परिपक्व होते व काढणीस येतो.डायरेक्ट पॅडीसिडर वजनाने हलके असल्यामुळे हाताळणी करण्यास सोपे असते. एक दिवसात एक हेक्टर क्षेत्र पेरणी केले जाते.यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चात बचत होते.

डायरेक्ट पॅडीसिडर यंत्राच्या सहाय्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरणी करावे असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी शहाजी शिंदे यांनी केले आहे. यावेळी पंचायत समिति सभापती अल्काताई आत्राम, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप बारामते, प्रशिक्षणार्थी गुणवंत माेरे, मुन्ना लाेणारे, प्रशांत कावटकर, प्रगतशील शेतकरी सुनील निमसरकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या