सावली:- सावली तालुक्यातील असोलामेंढा मुख्य कालव्यात आजोबा-नातू वाहून गेले. ही घटना शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. आजोबा भगवान लाटेलवार (70, रा. खांबाडा, ता. चिमूर) आणि नातू रोहित राजू गोरंतवार (14, रा. इंदिरा नगर, बोथली अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील घटना आहे. रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असे वाहून गेलेल्या नातू आणि आजोबाच नाव आहे. शनिवारी हे दोघे बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढाच्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.