गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संचालित मॉडेल कॉलेज येथील प्राध्यापकांचा थकीत वेतन संधर्भात समस्या होती. अभ्याँगत प्राध्यापक म्हणजे visiting faculty यांचे सत्र डिसेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीतले म्हणजे तब्बल आठ महिन्यांचे वेतन हे विद्यापीठात थकीत होते. त्या वेळेस असलेले मॉडेल कॉलेज चे प्राचार्य यांची बदली झाल्याने या काळात तासिका वेतणावर शिकविणाऱ्या दहा ते बारा प्राध्यपाकांचा पगार देण्यात आलेला नहता.
एक वर्ष लोटूनही वारंवार निवेदन, अर्ज देऊनही कसल्याही प्रकारचं पाहिजे तस सहकार्य मिळत नसल्याने काही प्राध्यापक यांनी शेवटी गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य तसेच युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा.निलेश बेलखेडे यांना या विषयात हस्तक्षेप करून थकीत वेतन मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली. या नंतर विषयच गांभीर्य समजून प्राध्यपकांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रा.निलेश बेलखेडे यांनी विदयापीठ कुलगुरू,मॉडेल कॉलेज प्राचार्य यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा सुरु ठेवला.
मागील 6ऑक्टोबर रोजी सन्माननीय आमदार सुधाकरजी अडबले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध समस्या संदर्भात बैठकीमध्ये हा विषय सिनेट सदस्य यांनी धरून लावला असता कुलगुरू महोदय बोकारे यांनी दिवाळीपूर्वी विषय मार्गी लावू असे आश्वासन यावेळी दिले यानंतर प्रा निलेश बेलखेडे यांनी पाठपुरावा सुरूच ठेऊन शेवटी दिवाळीच्या पाहिल्याच दिवशी हा विषय मार्गी लावून संबंधित प्राध्यापकांना दिवाळी गिफ्ट देऊन त्त्यांचे थकीन वेतन मिळवून दिले.
या प्राध्यपकांना दिवाळीच्या सणामध्ये हा मोठा दिलासा मिळाला असून मागील 1 वर्षपासून जास्त काळ होऊन न सुटलेला प्रश्न मार्गी लागल्यामुळे या सर्व अन्याय ग्रस्त प्राध्यपकांनी सदैव विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणारे गोंडवाना विदयापीठ सिनेट सदस्य तसेच युवासेना सचिव पूर्व विदर्भ प्रा. निलेश बेलखेडे यांचे तसेच विदयापीठ प्रशासनाचे सहकार्यकारिता आनंद व्यक्त करीत आभार मानले.
हा विषय मार्गी लागण्यामुळे प्रा. निलेश बेलखेडे यांनी सन्माननिय शिक्षक आमदार सुधाकर जी अडबाले यांच्या सहकार्यामुळे हा विषय मार्गी लागू शकला म्हणून त्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करीत धन्यवाद मानले सोबतच विद्यापीठ कुलगुरू श्री. बोकारे सर आणि संबंधित सर्व विदयापीठ प्रशासकीय अधिकारी यांचे सुद्धा आभार व्यक्त केले.