Chandrapur congress: 'राजुरा पॅटर्न'मुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये नाराजी! एकाच कुटुंबाकडे दोन, एकाच तालुक्यात तीन महत्त्वाची पदे

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक नेमणुकांवरून तीव्र नाराजीचे वातावरण आहे. राजुरा तालुक्यालाच तीन महत्त्वाची पदे देण्यात आल्याने पक्षातील दलित, आदिवासी आणि ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. Chandrapur 


माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यांचेच चिरंजीव शंतनू धोटे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि आता ॲड. कुंदा जेणेकर यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. Congress 


विशेष म्हणजे, हे तिन्ही महत्त्वाचे नेते राजुरा या एकाच तालुक्यातील आहेत. त्यातही, जिल्हा काँग्रेस आणि युवक काँग्रेस ही दोन महत्त्वाची पदे धोटे या एकाच कुटुंबाकडे आहेत. या 'राजुरा पॅटर्न'मुळे काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या दलित, आदिवासी तथा ओबीसीतील अन्य जातींमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे. Chandrapur congress 


आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या संघटनात्मक शक्तीच्या बळावर जिंकल्या जातात. मात्र, या नेमणुकांमुळे संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. मागील काही वर्षांतील संघटनात्मक नेमणुकांकडे नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, त्याचा परिणाम पक्षसंघटना कमकुवत होण्यात झाल्याचे बोलले जात आहे. RAJURA CONGRESS