Click Here...👇👇👇

गणपती विसर्जना दरम्यान तलावात बुडून एकाचा मृत्यू.

Bhairav Diwase
मुल तालुक्यातील घटना.
Bhairav Diwase. Aug 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- गणपती विसर्जना दरम्यान तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान मूल येथे घडली . मृतकाचे नाव मोरेश्वर तुळशीराम शेंडे , वय 35 राहणार मूल असे आहे . मूल मध्ये पाच दिवसांच्या घरगुती गणपतीचे काल बुधवारला बस स्थानका जवळील मामा तलावात विसर्जन करण्यात आले . मोरेश्वर सुद्धा घरगुती गणपती घेऊन पाण्यात उतरला असता त्याच ठिकाणी तो खोल पाण्यात बुडून मरण पावला . आज सकाळी मोरेश्वर शेंडे याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला . याप्रकरणी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे .