भारत बंद आंदोलनाला पाटण वासीयाकडुन चांगला प्रतिसाद.

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- संपूर्ण भारत बंद आंदोलनाला जिवती तालुक्यातील पाटण येथे संपूर्ण शेतकरी बांधव एकत्रीत येऊन पाठिंबा दिला आहे यात काही संघटना सुद्धा एकत्रीत येऊन कोणत्याही पक्षाचा नसुन आम्ही शेतकऱ्यांचे आहोत म्हणुन पाठिंबा दिला आहे व शेतकऱ्यांच्या मागन्या पुर्ण झालेच पाहिजे आम्ही कृषी प्रधान देशात राहुन सुद्धा आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय कशाला असे मत व्यक्त करत जिवती पंचायत समितीच्या सभापती सौ अंजना ताई पवार आंदोलनात सहभाग घेऊन भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.


      या वेळी उपस्थित पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मडावी मॅडम उपसरपंच श्नी मा. भिमराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.मा भिमराव पाटील मडावी माजी सरपंच श्री.मा सिताराम मडावी कलीम शेख आरीफ भाई शेख गोपाळ कासले सलिम भाऊ मारोती मेश्राम मा.हावगी शेटकर गणेश जाधव सुनील राठोड व सर्व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते