Top News

प्रजासत्ताक दिनानिमित्य व भिम आर्मीचे दिवंगत जिल्हा प्रमुख राजू देवगडे यांच्या जन्मदिनानिमित्य ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळांचे वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व भिम आर्मीचे पाहिले चंद्रपूर जिल्हा प्रमुख दिवंगत राजू देवगडे यांच्या जन्मदिनानिमित्य भद्रावती शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व भिम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण यांचे कार्याला यापुढेही भिम आर्मीतर्फे अविरत ठेवण्यात येईल असे भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख शंकर मून यांनी असा संकल्पही यावेळी करण्यात आला.
 

      यावेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या चळवळीला भिम आर्मीतर्फे पाठींबा देण्यात आला.व केंद्र शासनाने पोलिसांच्या माध्यमातून निरपराध शेतकऱ्यांवर जो लाठीहल्ला करून ही शेतकरी चळवळ दाबविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचा निषेध करण्यात आला. व त्याचवेळी समाजातील बहुजन व वंचित समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास त्या विरोधात उठाव करून त्यांना न्याय देण्याचेही आश्वासन त्यावेळी देण्यात आले. व गाव तेथे भिम आर्मीची शाखा उतरविण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे भिम आर्मीचे प्रदेश माजी उपाध्यक्ष राहुलदादा वाघ व जिल्हा प्रमुख शंकर मून यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून सांगण्यात आले. यावेळी भिम आर्मीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने