Top News

युवकाने केले बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंकीत.

सतत एक महिना होत राहिला अत्याचार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- बहीण-भावाच्या पवित्र नात्याला कलंकीत करण्याच्या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी नराधम भावाला गजाआड केले आहे. 
             प्राप्त माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील निंबाळा येथील एक अल्पवयीन शाळकरी मुलगी तालुक्यातील लोणारा येथे आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणाकरीता राहात होती. ती भद्रावती येथील एका विद्यालयात शिकत होती. लोणारा येथून ती रोज भद्रावतीला ये-जा करायची. दरम्यान,तिचा सख्खा चुलत भाऊ  प्रेमकुमार दिलीप सोनटक्के (२४) रा. सोनेगाव हा सुद्धा भद्रावतीला रोज ये-जा करायचा. त्यामुळे ते दोघेही मिळून जायचे व यायचे.याच संधीचा फायदा घेऊन प्रेमकुमारने तिला डिसेंबर महिन्यात आपल्या गावी नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीतेने कुठेही वाच्यता केली नाही. परंतु लोणारा येथे मुलीला बोलाविले असता प्रेमकुमार तिला नागपूरला घेऊन गेला व दोन दिवसांनी परत आला. घरच्या मंडळींनी त्यांची विचारपुस केली वरील माहिती उजेडात आली.त्यामुळे पिडीतेच्या आईने भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीला गजाआड केले असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने