Top News

काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचा "ले पंगा"; कबड्डीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चीतपट.

Bhairav Diwase.     Feb 18, 2021

चंद्रपूर:- काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना कबड्डी खेळताना पाहण्याचा योग समर्थकांना आला. धानोरकरांनी चंद्रपुरात कबड्डीच्या मैदानात उतरुन प्रतिस्पर्ध्याला चीत केले. 

राजकारणात विरोधकांशी दोन हात करणारे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर कबड्डीच्या मैदानातही जोशात उतरताना दिसले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन बाळू धानोरकरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धानोरकर यांनी कुस्तीचे डाव आजमावले.

प्रतिस्पर्ध्याला काही मिनिटातच चीत......

बाळू धानोरकर यांनी स्वतः मैदानात उतरुन खेळाडूंचा उत्साह वाढवला. काही मिनिटातच त्यांनी कबड्डीचे मैदान गाजवले. प्रतिस्पर्धी संघाच्या गड्याला चीत करत धानोरकरांनी समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला. धानोरकरांनी कबड्डीसारखा रांगडा खेळ खेळत राजकीय मैदानातही चीत करण्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने