🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विरारच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू.


Bhairav Diwase. April 23, 2021
पालघर:- दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. प्राथमिक माहिती नुसार एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत