🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोनाचे दहशतीत नागरिक, सर्वेक्षण करून तपासणी करण्याची भारतीय मानवाधिकार असोसिएशनची मागणी(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील गावागावात तापाने नागरिक फणफनत असून कोरोना बधितांच्या संख्येत अधिक भर पडत आहे राजुरा शहरात लागून असलेल्या बामणवाडा व चुनाळा या गावचे सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी करावी अशी मागणी भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे राज्य उपाध्याय बंडू मडावी व जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे केली आहे
  राजुरा तालुक्यातील गावात सध्या तापाची साथ सुरू आहे अनेक गावात लोक तापाने फणफनत आहेत तसेच बहुतांश गावात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे मागील तीन चार दिवसांपूर्वी चुनाळा व बामणवाडा येथील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे त्यामुळे कोरोनाचे दहशतीच्या सर्व लोक घाबरून आहे.
     यावर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य विभागाकडून चुनाळा व बामणवाडा या गावात  सर्वेक्षण करून तपासणी करावी अशी मागणी  भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे बंडू मडावी, मनोज आत्राम, रमेश आडे, निळकंठ साळवे आदींनी केली असून मागणीचे निवेदन आरोग्य पर्यवेक्षक मधुकर टेकाम यांनी स्वीकारले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत