Top News

निष्क्रीय पालकमंत्री व प्रशासनाचे ढिसाळ नियोजन जिल्ह्याच्या आजच्या स्थितीला जबाबदार!

काॅंग्रेसचे माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांची मुख्यमंत्री व काॅंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तक्रार!
Bhairav Diwase. May 18, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयात मेडीकल ग्रामीण कॉलेज, शासकीय रूग्णालय, रूग्णालय, प्राथमीक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधाचा अभाव तसेच पहिल्या व दुसर्या कोरोनाचे लाटेत कोरोनाबाधीतांचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जनतेमध्ये रोष व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाकडे खनिज विकास निधी, उद्योगांकडील सीएसआर निधी उपलब्ध असतांना साधन सुविधां उपलब्ध करून देण्यात प्रशासनालार अपयश का आले व वाढते मृत्यूसंख्येला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत चंद्रपूरचे काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी खासदार नरेश पुगलीया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून चंद्रपुरातील वाढत्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रूग्णांसाठी लागणाच्या ऑक्सीजन, व्हेन्टीलेटर, बेडची कमतरता, तुटवडा, डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफची कमी, शासनाचे निर्देशानुसार कॉन्ट्राक्ट पद्धतीने डॉक्टर व इतर स्टॉफच्या नियुक्तीचे अधिकार असतांना सुद्धा तसेच कोरोनामध्ये काम करणार्या स्टॉफला वाढीव वेतन देण्यास नकार, त्यामुळे दोन-दोनदा इंटरव्हयू घेऊन सूद्धा नियूक्तीस विलंब त्यामूळे दरोज २० ते औषधीचा ३० च्या संख्येत मृत्यूसंख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हयात खनिज विकास निधीचा हक्काचा भरमसाठ पैसा असतांना व जिल्हा नियोजन फंडातून खर्चाचे अधिकार प्रशासनाला असतांना सुद्धा डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणे काय ? या भरमसाठ मृत्युला जबाबदार कोण ? यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुगलीया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
चंदपूर जिल्हापरिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करून एक दिवसाचे पगारातून जमा झालेल्या राशीच्या माध्यमातून ५ एम.डी.डॉक्टरची नियुक्ती, त्यांना १ लाख रूपयाचा पगार देण्याचा निर्णय जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेऊ शकतात तर जिल्हाचे पालकमंत्री का नाही ? पोलीस विभागाला १५ नवीन जिप गाडया देण्यास पालकमंत्री तत्पर राहतात, तर डॉक्टरना व
मेडीकल स्टॉफला वाढीव पगार देण्यास तयार का राहत नाही ? कमीतकमी रुग्णाचे जीव वाचले असते, अशी बुध्दी प्रशासनाला कोण देईल ? असेही पुगलीया म्हणाले आहेत.
पहिल्या कोरोना लाटेत २०० चे वर रुग्णाना आपले जीव गमवावे लागले, दुसर्या लाटेत १२५० चे वर मृत्युचा आकडा गेला असून आता तरी जिल्हयाचे सर्व लोकग्रतीनिधी, जिल्हाप्रशासन, संबंधीत अधिकारी वर्ग यांनी, आता तरी प्रामाणिकपणे अमलबजावणी करावी व डॉक्टर व इतर मेडीकल स्टॉफला अधिकचा पगार देऊन त्यांचेकडून सेवा करून घ्या तसेच औषधीचा साठा व इतर साहीत्याचा त्वरीत पुरवठा करा व रूग्णाचे प्राण वाचवा, असे आवाहन पुगलीया यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने