Top News

वैनगंगा नदीच्या पात्रात नाव (डोंगा) बुडाला.

नावात (डोंगा) बसलेल्या 3 मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- तालुक्यातील वाघोली येथील तिन अल्पयीन मुली नावेने वैनगंगा नदीच्या पात्रातून दुसऱ्या बाजूस जात असतांना नाव अचानक नदीपात्रात बुडाल्याने तिनही अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
समृद्धी ढिवरु शेंडे (११), सोनी मुखरू शेंडे (१३) दोन्ही रा. वाघोली व पल्लवी रमेश भोयर (१३) रा. येवली असे मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतक तिनही अल्पवयीन मुली काही कामानिमित्य नदीपात्रातून नदीच्या दुसऱ्या बाजूस नावेन (डोंगा) जाण्यास निघाले. दरम्यान नदीपात्रात अचानक नाव पलटी झाली. यावेळी तिघेही नावेसह खोल पाण्यात बुडाले असता तिघांचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याला देण्यात आली असता, चामोर्शी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले व शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने