धिडसी येथे सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते अँटीजेन केंद्राचे उद्घाटन

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज 18 मे 2021 रोज मंगळवारला धिडसी येथे कोविड अँटीजेन केंद्र उद्घाटनप्रसंगी जि. प. सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांनी धिडसी येथील कोविड अँटीजेन केंद्र सुरू करून धिडसी गावातील सर्व जनतेनी ही चाचणी करून घ्यावी असे आव्हान केले.
सोबतच गावातील सर्वच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता अँटीजेन करून कोविडला प्रतिबंध घालण्याची विनंती सभापती सुनील उरकुडे यांनी याप्रसंगी केली. नागरिकांना कमी अंतरावर अँटीजेन चाचणी करता यावी यासाठी हे केंद्र उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची विनंती त्यांनी केली.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच रिना हनुमंते, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तसेच डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर, आणि गावकरी उपस्थित होते.