Top News

ना बेड - ना ऑक्सिजन; उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू‌.

जगण्यासाठी केला होता ४०० किमीचा प्रवास.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघांतील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना येथील विकास रमेश गेडाम (वय 30 वर्षे) याला 1 तारखेला दम्याचा त्रास वाढला. सिंदेवाहीला नेऊन कोरोना टेस्ट केली. अँटीजन रिपोर्ट निगेटिव्ह आली. सिटीस्कॅन करण्यात आले. आरटीपीसीआर रिपोर्ट लवकर मिळाली नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या डाक्टरला माहिती कळवली. त्यांनी पेशंटला ऑक्सिजची गरज आहे. तुरंत हॉस्पिटला नेण्यास सांगितले व 2 मे ला अंबुलन्स मागविली. पण मिळाली नाही. शेवटी प्रायव्हेट गाडी करून सिंदेवाही येथील हस्पिटल शोधले. तिथे ऍडमिट केले नाही. नंतर ब्रम्हपुरी तिथेही बेड मिळाला नाही. गडचिरोलीला नेले तिथेही ऍडमिट करून घेतले नाही. शेवटी चंद्रपूरला आणले. प्रायव्हेट हास्पिटलमध्ये फिरले तिथेही ऍडमिट केल्या गेले नाही. अशाप्रकारे या दिवशी 250 किमी प्रवास उपचारासाठी करावा लागला. शेवटी चंद्रपूर शासकीय जिल्हा रुग्णालयात आणले. तिथे चिट्टी काढली. डाक्टर कडे ऑक्सिजनसाठी नेले. त्या ठिकाणी पेशंटला ऑक्सिजनची नितांत गरज आहे, त्याच्यावर उपचार सुरू करा, असे वारंवार हात जोडून विनंती केल्या गेली. परंतु डाक्टरणी पेशंटकडे डोकावून पाहिले सुद्धा नाही व रांगेत राहण्यास सांगितले. लिस्टमध्ये नाव लिहा. तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला आवाज देऊ असे सांगून कोविड रूममध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन लावलेले रुग्ण होते. त्या ठिकाणी सांयकाळ पर्यंत ठेवल्या गेले. रुग्ण दम्याने खूप तळफळत होता. नातलगांच्या डोळ्यातून पाणी येत होते. दम दाटत आहे म्हणून रुग्ण सांगत होता. डाक्टरला अक्सिजन बेड द्या, आमच्या पेशंटला बघा, अशी विनंती नातलग करीत होते. परंतु, बेड मिळाला नाही.

शेवटी दवाखान्यासमोरील आंबूलन्समधून 2000रु तासांनी ऑक्सिजन मिळवला. तोदेखील २ तासाने लावण्यात आला. शेवटी रात्रीला रुग्णाला गावाकडे परत आणले गेले. दुसऱ्या सकाळी 3 तारखेला पुन्हा उपचारासाठी नवरगाव व ब्रम्हपुरी नेण्यात आले. तेव्हाही बेड, अक्सिजन मिळाला नाही. पुन्हा चंद्रपूरला नेऊ असे ठरले व सिंदेवाहिला आरटीपीसीआर टेस्ट विचारण्यास गेले. रुग्ण जगला पाहिजे, त्याच्यावर उपचार झाला पाहिजे म्हणून सिंदेवाही, नवरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, चंद्रपूर येथील अनेक दवाखान्यात मध्ये जाऊन उपचारासाठी विनंती केली. डोळ्यातून अश्रू गाळत जीवाचे रान केले. पैसेही मोजलेत. पण, शेवटी गाडीतच रुग्णांने प्राण सोडला.
पण, आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाली नाही. आक्सिजन, अंबुलन्स मिळाली नाही. कदाचित तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर, अक्सिजन, अंबुलन्स मिळाली असती. त्या रुग्णांचे प्राण वाचले असते. अशी वेळ तुम्हा आम्हावरही येऊ शकते, त्यामुळे सावधान! कारण, प्रशासन झोपलाय... आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.

लोकप्रतिनिधी नेमके आहेत तरी कूठे?

चंद्रपूर जिल्ह्यातील ही केवळ एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने त्यांचा जीव जातं आहे. पण जिथे लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांनी या गंभीर बाबी कडे गांभीर्ऱ्याने बघायला हवे? खरं तर लोकप्रतिनिधी हा जनतेच्या मताने निवडून येतो. पण जेंव्हा जनतेला मदत करायची असते तेव्हा हे लोकप्रतिनिधी नेमक्या कुठल्या गुहेत असतात हेच कळत नाही? आता तरी जनतेने आपला लोकप्रतिनिधी हा जनसेवक असलेला निवडावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने