💻

💻

जिवती तालुका वासियांसाठी आनंदाची बातमी उद्यापासून सर्वांसाठी मोफत लस उपलब्ध होणार.

पंचायत समिती जिवती येथील उपसभापती श्री. महेश देवकते यांच्या पाठपुराव्याला अखेर यश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुका हा आदिवासी बहुल ग्रामीण भागात आहे. जिवती नगर पंचायत व ग्रामीण भागात Covid-19 रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचार करणे कठीण जात होते. तालुक्यातील लोकांना लस उपलब्ध झाल्यास कोव्हीड आजारापासून नागरीकांची सुरक्षा होऊ शकते, यासाठी लोक लेखा समितीचे अध्यक्ष मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रिय मंञी हंसराज अहिर यांचेकडे जिवती पंचायत समितीचे उपसभापती श्री.महेश देवकते यांनी तालुक्यातील नागरिकांना मोफत लस मिळावी याकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या मागणीनूसार व जिवती तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव चे वाढते प्रमाण लक्षात घेता सामान्य रुगणालय, चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.एन.बी.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.गेहलोत यांना झूम ऍप च्या सभेत लोक लेखा समितीचे अध्यक्ष मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रिय मंञी हंसराज अहिर यांनी सूचना केल्यानंतर उद्यापासून जिवती तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण होणार आहे.
18 वर्ष वयोगटावरील प्रौढांसाठी विदर्भ महाविद्यालय, जिवती तसेच 45 वयोगटावरील नागरिकांकरीता वणी (बु.) व टेकामंडवा येथे मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी जिवती तालुक्यातील नागरिकांनी कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी निःसंकोच कोव्हीड प्रतिबंधक लस टोचून घेण्याचे आवाहन जिवती पंचायत समितीचे उपसभापती श्री. महेश देवकते यांनी सोशल मिडीया व वर्तमानपञाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत