जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

भद्रावतीचा अय्युबखान ठरला कोरोना योद्धा.

रात्रंदिवस चालवतोय ऑक्सिजन पुरवठा करणारे टॅंकर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले असून प्रत्येक जण स्वत:ला सुरक्षित ठेवत असतानाच ऑक्सिजन पुरवठा करणारे टॅंकर रात्रंदिवस चालवून जनतेची सेवा करणारा अय्युबखान पठाण कोरोना योद्धा ठरला आहे.

   भद्रावती शहरातील अय्युबखान पठाण हा ऑक्सिजन पुरवठा करणा-या टॅंकरवर चालक म्हणून काम करतो. सध्या परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची खुप गरज आहे. परंतू ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याकरीता ऑक्सिजनची निर्मिती आणि वाहतूक करण्याचे काम जोमात सुरु आहे. त्यामुळे अय्युबखाॅं पठाण हा रमजानचा पवित्र महिना असतानासुद्धा आपले घरदार,कुटुंब बाजुला सारुन ओरिसा,मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून टॅंकरद्वारे ऑक्सिजनची वाहतूक करुन आपली सेवा देत आहे. त्याच्या या सेवेला येथील कामरान खान व मित्रमंडळ आणि भद्रावतीकरांनी सलाम केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत