राज्यातील सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन जिल्हा परिषद कार्यालयात उभे करू.

Bhairav Diwase
असा इशारा व्यावसायीक प्रवासी वाहन चालक मालक भद्रावती यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- मागच्या वर्षी मार्च २०२० पासुन कोव्हिड -१९ च्या प्रादुर्भावामुळे शासणाने लॉकडॉऊन लावला होता. त्यानंतर डिसेंबर जानेवारी मध्ये थोडी सुट मिळाली आणि ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा चालु झालाचं होता की, यावर्षी मार्च २०२१ पासुन पुन्हा लॉकडॉऊन लावण्यात आला. त्यामुळे सर्व पर्यटन स्थळं, मंदिर, यात्रा, लग्न, शाळा कॉलेज हे बंद आहे. याचा परिणाम हा टुरिस्ट टॅक्सी, व्यावसायिक प्रवासी वाहन व्यवसायावर पडला आहे.
        
      मागच्या एक वर्षापासुन सतत व्यवसाय बंद असल्यामुळे सध्या वाहनांवर असलेले कर्ज, इन्शुरंस, रोड टॅक्स हे सर्व भरायचे कसे. असा प्रश्न सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन मालकाला पडला आहे. 
                    त्यामुळे सर्व टुरिस्ट टॅक्सी, व्यावसायिक प्रवासी वाहन चालक मालकांच्या काही मागण्या आहेत. त्यावर आपण विचार करावा.
                    
👉सतत एक वर्षापासुन व्यावसायिक प्रवाशी वाहणांचा व्यवसाय बंद असल्यामुळे वाहनांवरील कर्जाचे हफ्ते हे किमान सहा महिण्यांसाठी विना व्याज समोर ढकलावे.

👉बँकांकडुन कोणत्याही व्यावसायिक प्रवासी वाहन मालकांवर जोर जबरदस्ती अथवा फोन व्दारे मानसिक त्रास होणार नाही. असे आदेश बँकांना देण्यात यावे.

👉ज्या व्यावसायिक प्रवासी वाहनांचे इन्शुरंस नुतनिकरण केले आहे. असे वाहन प्रादेेशिक परिवहन अधिकारी यांच्या संमतीनुसार (No Use Certificate) पार्किंग यार्ड मध्ये उभे आहेत. त्यांचे इन्शुरंस जेव्हा पर्यंत व्यावसायिक प्रवासी वाहणांचा व्यवसाय पुर्ववत चालु होत नाही. तेव्हा पर्यंत Insurance Extend करावे.
Insurance Extend करण्याचे आदेश सर्व इन्शुरंस कंपणी यांना देण्यात यावे. जणेकरून इन्शुरंस कंपण्या टाळाटाळ करणार नाही.

👉मार्च २०२१ नंतर ज्या व्यावसायिक प्रवासी वाहनांचे टॅक्स भरले आहे अशा व्यावसायिक प्रवासी वाहणांचे टॅक्स Carry Forward करावे.

👉मार्च २०२० पासुन सर्व शाळा महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे सर्व School Bus, School Van यांचे टॅक्स शाळा महाविद्यालय चालु होत नाही. तेव्हा पर्यंत माफ करावे.

👉पर्यटन स्थळं, मंदिर, यात्रा, लग्न समारंभ, शाळा महाविद्यालय एक वर्षापासुन बंद असल्यामुळे व्यावसायिक प्रवासी वाहन चालक मालक यांच्या वर उपासमारिची वेळ आली आहे.


     त्यामुळे अशा सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालक मालक तसेच स्कुल बस - व्हॅन चालक आणि कंडक्टर यांना दर महा १०,००० रूपये ऐवढी रक्कम उदर निर्वाहासाठी देण्यात यावी. जेणे करून शाळा बंद असली तरी मुलांच्या शिक्षणाची फी, घरभाडे, ईलेक्ट्रीक बील आणि परिवारांच्या पोटासाठी अन्न धान्याची सोय करता येईल.
          आमच्या मागण्यांचा आपण सहानुभुतिपुर्वक विचार करावा आणि यावर लवकरात लवकर उपाययोजणा कराव्या.
               असे न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालक मालक रस्त्यावर उतरतिल आणि राज्यातील सर्व वाहन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालयात उभी करण्यात येईल. असा इशारा सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालक मालक, भद्रावती महाराष्ट्र राज्य यांनी दिला.

असे निवेदन भद्रावतीचे तहसिलदार यांच्या मार्फत मा. परिवहन आयुक्त ( म.रा.), मा. मुख्यमंत्री ( म.रा.), मा परिवहन मंत्री ( म.रा.), मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर, मा.खासदार बाळुभाऊ धानोरकर, मा. जिल्हाधिकारी जिल्हा चंदपूर, मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना पाठविण्यात आले. निवेदन देतांना प्रविण चिमुरकर, आशिष कार्लेकर, दिनेश शर्मा, रतन सुकारे, हरिदास खोब्रागडे, किरण बावणे, निलेश कुटेमाटे, गुलाब बेलेकर यांची उपस्थिती होती.