जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

पियुष कंट्रक्शन कंपनीचे अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन सुरु:- अविनाश पाल.

लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या कंपनीची चौकशी करून दंडात्मक व फौजदारी कार्यवाहीची निवेदनाद्वारे केली मागणी.
Bhairav Diwase. May 05, 2021
(संग्रहित छायाचित्र)
सावली:- गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत विभागीय कार्यालय आसोलामेंढा नुतनीकरण क्र. २ सावली या देखरेखीखाली तालुक्याच्या नहराच्या नुतनीकरनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामध्ये नहरावरती मुरुम टाकणे व लेवलिंग करणे तसेच सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरु आहे. सदर व्याहाड बूज, सामदा, कापशी, उपरी, गवार्ला, रयतवारी इ. गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जाणाऱ्या मोठे नहराचे व लहान नहराचे काम पियुष कंट्रक्शन कंपनी करत आहे. उपरी हेटीच्या शिवारातून तर महसूल विभागाच्या जागेमधून व शेतकऱ्या च्या अतिक्रमित शेतातून अवैध्य विना रॉयल्टीचे मुरूम उत्खनन सुरु आहे.
तसेच सदर कामात सामदा शेतशिवारातील रॉयल्टी कमी प्रमाणात काढून जास्तीचे उत्खनन सुरु असून सायंकाळच्या वेळेस काही महसुली व शेत शिवारातून विना रॉयल्टी मुरुमाचे अवैध्य उत्खनन सुरु आहे. सदर कंपनीने शासनाचा लाखो करोडो रुपयाचा महसूल बुडवीलेला आहे. अश्या लाखो रुपयाचा महसूल बुडविणाऱ्या कंपनीची चौकशी करून दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अविनाश पाल यांनी जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत