🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ई-मेल किंवा मेसेजव्दारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर सावधान!

गृहमंत्रालयाचा अलर्ट.....

नवी दिल्ली:- जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला ई-मेल किंवा मेसेजद्वारे जॉब ऑफर येत असतील तर ही खुश होण्याइतकीच चिंतेही बाब आहे. कारण असे मेसेज मिळाल्यानंतर सावधपणे हाताळण्याची आवश्यकता आहे. गृह मंत्रालयाने अशा फ्रॉड किंवा सायबर क्राईम संदर्भात एक अलर्ट जाहीर केला आहे. सरकारने या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मेसेज पाहून त्यावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी अनेक वेळा विचार करा. असे केल्याने तुमचे नुकसानदेखील होऊ शकते.



या प्रकारे ई-मेल येतात......

सरकारच्या अलर्टनुसार काही फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती ऑनलाईन नोकरीच्या संधीसंदर्भात सरकार किंवा कॉर्पोरेट संस्था, कंपन्या यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत. तुमच्या ई-मेल किंवा मेसेंजिंग ॲपवर पाठवण्यात आलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध राहा. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी या वेबासाईटवर ऑथेंटिसिटी तपासून घ्या. गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हॅंडल असलेल्या सायबर दोस्तकडून यासंदर्भात एक अलर्ट जाहीर करण्यात आले आहे आणि सांगण्यात आले आहे की कशा प्रकारे फसवणूक टाळता येऊ शकते.


सायबर दोस्त.....

सायबर दोस्तच्या अधिकृत ट्विटर खात्यावर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की तुमच्या ईमेल किंवा मेसेजिंग ॲपवर पाठवण्यात आलेल्या बनावट जॉब अपॉईंटमेंट लेटरपासून सावध राहा. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती रजिस्ट्रेशन किंवा मुलाखतीच्या शुल्काच्या नावाखाली तुम्हाला फसवू शकतात. काही फ्रॉड व्यक्ती ऑनलाईन नोकरीच्या संधी दाखवत सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्या नावाचादेखील गैरवापर करत आहेत. नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याआधी वेबसाईटवर त्याची सत्यता तपासा.


इथे करा तक्रार.......

जर तुम्हाला असे वाटते की तुमच्याबरोबर काही चुकीचे होते आहे की तुमची फसवणूक होते आहे तर तुम्ही याची तक्रार सायबर दोस्तची अधिकृत वेबसाईट www.cybercrime.gov.in वर जाऊन तक्रार करू शकता.



तुमचा यूपीआय कोणालाही सांगू नका......

सायबर दोस्तने नागरिकांना यूपीआय (UPI)संदर्भात करण्यात येणाऱ्या फ्रॉडबद्दलही नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. आपल्या यूपीआय पिनची माहिती कोणालाही देऊ नका. यूपीआय पिन गुप्त ठेवा. जिथे तुमच्या यूपीआय पिनची माहिती विचारली जाते अशा फ्रॉड आकर्षक जाहिराती किंवा ऑफरवर क्लिक करू नका. हा तुमच्या यूपीआय खात्यातून पैसे गायब करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेकडून किंवा कंपनीकडून आलेला क्युआर कोड कधीही स्कॅन करू नका. यामुळे तुमच्या खात्यातून सर्व पैसे गायब होऊ शकतात. यूपीआय तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी पिनसंदर्भातील माहिती विचारत नाही.

दिवसेंदिवस सायबर क्राईम किंवा ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच नागरिकांनी यासंदर्भात सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही मोहाला किंवा गैरप्रकाराला नागरिकांनी बळी पडू नये यासाठी सरकार आणि बॅंकांकडून वेळोवेळी अलर्ट जाहीर करण्यात येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत