died due to electric current: पतंग उडविताना उच्चदाबाच्या तारांचा स्पर्श होताच बालकाचा मृत्यू

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर वॉर्ड क्रमांक ४, भीमनगर येथे रविवारी दुपारच्या सुमारास पतंग उडवित असलेल्या आभास अरविंद पटेल (१० ) या बालकाचा ११ केव्हीच्या उच्चदाबाच्या विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. electric current


भीमनगर येथील मुन्ना लोणारे यांच्या घराच्या स्लॅबवर आभास पतंग उडवीत होता. घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या तारेचा पतंगाशी संपर्क येताच आभासला विद्युत धक्का बसला. शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आभासचा मृत्यू झाला होता. परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. died due to electric current