Chandrapur News: भाजीचा वाद, रक्ताचे नाते संपुष्टात; वडील-मोठ्या भावाने लहान भावाला केले रक्तबंबाळ
सोमवार, नोव्हेंबर २४, २०२५
सिंदेवाही:- सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीतील पेटगाव येथे भाजी आणि कौटुंबिक वादातून वडील आणि मोठ्या भावाने लहान भावाला जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. जीवनदास रामचंद्र शेरकुरे (३०) त्यांचे वडील रामचंद्र केशव शेरकुरे (६०) यांनी मुलगा प्रणय उर्फ मंगल रामचंद्र शेरकुरे (२५) याच्यावर काठी आणि कव्हेलूने जीवघेणा हल्ला केला. Chandrapur News
घटनेपूर्वी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर, आईने मटकीची उसळ बनवली होती. मात्र, ती नको म्हणून दुसरी भाजी प्रणयने मागितली. त्यानंतर, टोमॅटोची चटणी बनविताना पुन्हा वाद निर्माण झाल्याचे आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. Beating
प्रणय दारू पिऊन वारंवार आई-वडिलांशी वाद घालायचा. त्यातून चिडलेल्या वडील आणि मोठ्या भावाने संतापाच्या भरात प्रणयवर काठी आणि कव्हेलूने प्रहार केले. डोक्यावर बसलेल्या जबर मारामुळे प्रणय गंभीर जखमी झाला. जखमीला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर दाखल करण्यात आले. Chandrapur police


