Top News

सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिराेली:- गडचिराेली जिल्हा आता लेव्हल-१ मध्ये माेडत असल्याने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. साेमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी २१ जून राेजी काढले आहेत.
सर्वच प्रकारची दुकाने नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. रेस्टाॅरंट, उपहारगृहे, माॅल, सिनेमागृहे सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने नियमित सुरू ठेवता येतील. शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती १०० टक्के ठेेवता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनाेरंजन इत्यादी गर्दीची ठिकाणे साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काेविड निर्देशांच्या अधीन राहून ५० टक्के क्षमतेच्या आत व कमाल मर्यादा १०० लाेकांची राहील.
विवाह कार्यक्रमाला १०० व अंत्यविधीस ५० लाेकांच्या उपस्थितीस मान्यता देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंड ठाेठावला जाईल.
कृषीविषयक दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू राहण्यास पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठेची वेळ वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीच्या आठवड्यापर्यंत गडचिराेली जिल्हा
लेव्हल-३ मध्ये माेडत हाेता. मात्र, १७ जून राेजीच्या काेराेना रिपाेर्टनुसार गडचिराेली जिल्हा आता
लेव्हल-१
मध्ये आला आहे. गडचिराेली जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट
३.५३ एवढा आहे.
एकूण ८६४ बेडपैकी
१० बेडवर रुग्ण आहेत, तर ८५४ बेड रिकामे आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने