चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विजयी सात नगरसेवकांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. हा विजय केवळ आमचा नसून सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाचा आहे, असे स्पष्ट शब्दांत सातही नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक निवडून आले असून या यशामागे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात केलेले विकासकामे निर्णायक ठरले आहे.
राहुल पावडे, सविता कांबळे,प्रज्वलंत कडू, जयश्री जुमडे,सुनीता जयस्वाल, संगीता खांडेकर, रवी लोणकर आज प्रत्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेटत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले,विकासाभिमुख दृष्टिकोन, चंद्रपूर शहरासाठी राबवलेली विविध विकासकामे यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरात मोठा जनाधारामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा विजय आम्हाला शक्य झाला असे मत सर्वांनी व्यक्त केले.
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शहरातील प्रत्येक प्रभागात भाजपचा नगरसेवक निवडून यावा, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेत जोरदार प्रचार केला होता. विविध वॉर्ड आणि प्रभागांमध्ये त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधत विरोधकांच्या आरोपांची पोलखोल केली आणि मुद्देसूद पद्धतीने उत्तर दिले होते. त्यांच्या या आक्रमक आणि प्रभावी प्रचाराचा थेट फायदा पक्षाच्या उमेदवारांना झाल्याचे नगरसेवकांचे मत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शहराचे नाव राज्याच्या पातळीवर अग्रस्थानी राहावे, यासाठी सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक कामात शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी राहिले आहे. चंद्रपूरमध्ये झालेला विकास, तसेच राष्ट्रीय पातळीवर आलेले महत्त्वाचे प्रकल्प हे त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीची साक्ष देतात, असे मत विजयी नगरसेवकांनी व्यक्त केले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाचा दृष्टिकोन, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी असलेली तत्परता आणि शहराच्या भविष्यासाठीची दूरदृष्टी यामुळे अनेक नगरसेवक प्रभावित झाले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवून आम्ही हे यश संपादन करू शकलो, अशी भावना राहुल पावडे, सविता कांबळे,प्रज्वलंत कडू, जयश्री जुमडे,सुनीता जयस्वाल, संगीता खांडेकर, रवी लोणकर या विजयी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
विजयानंतर या सातही नगरसेवकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि हा विजय केवळ आमचा नसून सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाचा आणि नेतृत्वाचा असल्याचे कृतज्ञतपूर्वक सांगितले. या भेटीमुळे चंद्रपूरच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व आणि प्रभाव पुन्हा अधोरेखित झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

