Top News

युवा मोर्चाच्या माध्यमातुन समाजात रचनात्मक कार्य व्हावे! जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे.


भाजयुमोची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.

पक्षकार्यात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने पाठीच्या कण्याप्रमाणेचं नेहमी आधार द्यावा:- जिल्हा प्रभारी सोपान कणेरकर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा यांचे वतीने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठक चंद्रपुरातिल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात आज पार पडली.
यावेळी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी कार्यकारिणीच्या स्थापनेपासून ते आजतागायत संपूर्ण जिल्ह्यात युवा मोर्चाच्या माध्यमातुन झालेल्या अनेकानेक कार्यक्रम, उपक्रमांची माहिती अहवाल स्वरुपात भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या समक्ष प्रदेश भाजयुमोचे सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी सोपान कणेरकर यांचेतर्फे प्रदेशाला पाठविली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलतांना, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, की गतकाळात जिल्ह्यात कोविडने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आणि जिल्ह्याच्या काही भागांत याच काळात पावसाविना पूर आला, मोठी हानी झाली. अनेकांचे घरे बेघर झाली. कोविडच्या थैमानात सोबत लाकडाऊनमूळे कित्येकांचे संसार उघड्यावर आले. पण अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या आर्त हाकेला ओ देत शासन व प्रशासनाच्या आधीही कुणी तत्परतेने धावला असेल तर तो माझा भाजपचा कार्यकर्ता होता. आणि अशा कार्यकर्त्याच्या मला कायम अभिमान आहे.
उद्भवलेल्या या एकूणच परिस्थितीत लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, हंसराजभैय्या अहीर असतील तर कुठे आ. बंटीभाऊ भांगडीया, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, माजी आमदार अॅड. संजय धोटे यांच्या माध्यमातुन जनतेला मोठी मदत झाली. हे सर्व करतानी युवा मोर्चाचा कार्यकर्ता मला अग्रणी दिसत होता. याचा विशेष आनंद वाटतो. आज जिल्ह्यात कोविडची स्थिति मोठी भयानक होती. बेडसाठी, आॅक्सीजनसाठी तर कुठे एम्बुलेंससाठी लोकांना शक्य तेवढी मदत करता आली ती तुमच्या सारख्या सेवाशील व तत्पर कार्यकर्त्यांमुळेचं हे नाकारता येत नाही. जवळजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात सेवायज्ञच चालवला.
🆘 पुढे बोलताना, युवा मोर्चाच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या जातात त्या अपेक्षा तुमच्याकडून अनेकदा पूर्ण होताना दिसल्या, मगं त्यात बल्लारपूरात आलेल्या माजी गृहमंत्र्यांना काळ्या फित्या दाखवून त्यांचा केलेला जोषपुर्ण निषेध असो किंवा या महाभकासआघाडीचे सरकारच्या धोरणांविरोधात भद्रावतीत टॉवरवर चढून केलेले निषेध आंदोलन असो. तुमच्याकडून या निद्रिस्त सरकारचे लक्ष चंद्रपूरकडे वेधण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे येणार्‍या काळातही तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत, आपण पदासाठी नव्हे तर सेवेसाठी, सहकार्यासाठी समोर आले पाहिजे. समाजातील अनेकानेक अराजकीय तरुणांना पक्षाशी जोडता आले पाहिजे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण आग्रह धरायला हवा. अशारीतीने आपण युवामोर्चाचे मनगट मजबूत करण्यासाठी सत्कार्य करा. असेही जिल्हाध्यक्ष भोंगळे म्हणाले.
तसेच जिल्ह्यात सूरू होण्याऱ्या आत्मनिर्भर अभियानाला ही त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत, जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातुन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या सर्व कार्यक्रम-उपक्रमांचा धावता आढावा दिला. यासह कोविड-१९ सारख्या जीवघेण्या महामारीमध्येही भाजयुमोचा प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या निर्धाराने प्रत्यक्ष तर कुठे अप्रत्यक्षपणे समाजसेवेसाठी कार्यमग्न होता, हे सांगितले.
तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रभारी सोपान कणेरकर म्हणाले, की भारतीय जनता पार्टीचे कोणत्याही आंदोलन वा कार्यक्रमात तुमच्यासारख्या युवा मित्रांची दर्शनी फौज त्या कार्यक्रमात नवचैतन्य जागवत असते. खरेतर युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाच्या पाठीच्या कण्याप्रमाणेचं आहे. त्यामुळे आपण युवा मित्रांनी नेहमी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात मोठ्या संख्येत व मोठ्या जोशात हजर असले पाहिजे, शिवाय युवामोर्चाच्याकडून पक्षाला अनेक अपेक्षा आहेत, म्हणून आपणही पाठीच्या कण्याप्रमाणे आधार देण्याचे कार्य केले पाहिजे.
यासोबतचं आत्मनिर्भर अभियानाचे प्रदेश संयोजक सारंग कदम यांनीही आपल्या मार्गदर्शनात युवा मोर्चाचा कार्यकर्ता कसा आत्मनिर्भर होऊ शकेल, किंबहुना त्याच्या माध्यमातुन मोदी सरकारचे अनेकानेक सर्वकष योजना समाजघटकांपर्यंत कसे पोहचतिल याविषयी माहिती दिली.
याठिकाणी उपस्थित झालेल्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना कोविड-१९ च्या प्रादुर्भावापासून बचावाकरिता फेसशिल्डचे वाटपही करण्यात आले.

पार पडलेल्या या बैठकीला, आत्मनिर्भर अभियानाचे प्रदेश संयोजक सारंग कदम, प्रदेश कार्यकारिणीचे रितेश रहाटे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महेश देवकते, युवती प्रमुख स्वाती देवाळकर यांसह युवा मोर्चा सर्व उपाध्यक्ष, सचिव आदींसह युवा मोर्चाचे इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याभरातून आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने