🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

महिलांचा व्यवसाय जाणार सातासमुद्रापार. #Business #Pombhurna #mul #Overseas

पोंभुर्णा, मुल तालुक्यातील कोर्पेटाना मिळणार ओळख.
चंद्रपूर:- कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी मात्र गरुडझेप घेतली आहे. जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा येथे कार्पेट महिलांनी तयार केला. या कार्पेटची विदेशवारी होण्याच्या दृष्टीने वाराणशीजवळील भदोई येथील दोन कंपन्या प्रयत्नशील आहेत. युरोप आणि अमेरिकेत या कार्पेटची विक्री कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टीने दोन्ही कंपन्या प्रयत्नरत आहेत. सध्या कार्पेटनिर्मिती केंद्रात ८० महिला कार्यरत आहेत. कार्पेट निर्मितीमुळे भविष्यात जिल्ह्यातील महिलांना रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. #Business #Pombhurna #mul #Overseas

चंद्रपूर जिल्हातील कार्पेट आता परदेशात जाणार; पोंभुर्णा, मुल मधील कार्पेट प्रकल्प. https://www.adharnewsnetwork.com/2020/11/blog-post_401.html


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा या दोन्ही तालुक्‍यांत धानासोबत कापूस, सोयाबीनचे पीक घेतले जाते. शेतीतून साधारणत: चार महिने तालुक्‍यातील महिला मजुरांना रोजगार मिळतो. मात्र, त्यानंतर दोन्ही तालुक्‍यातील महिला, मजूर कामगारांची रोजगारासाठी भटकंती सुरू होते. अशातच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
चांदा ते बांदा या योजनेतून पोंभुर्णा, मूल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र उभे झाले. हे केंद्र महिलांच्या आयुष्यात रोजगाराची नवी संधी निर्माण करणार होते. या प्रशिक्षण केंद्रातून महिलांना लोकरीपासून कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे प्रशिक्षणही आटोपले होते. लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाचे संकट देशावर आले. प्रशिक्षण झालेल्या महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली.
शेवटी टाळेबंदी मागे घेतली गेली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत कार्पेट निर्मिती केंद्र सुरू झाले. महिला चांगल्या पद्धतीने कार्पेट तयार करीत आहेत. त्याची दखल वाराणशीजवळील गोपीगंज या पुरवठादारांनी घेतली. त्यांनी दोन्ही केंद्राला कार्पेटचे मोठे ऑर्डर दिले आहेत. या दोन्ही कंपन्या चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेल्या कार्पेटची विदेशातील काही कंपन्यांशी प्राथमिक चर्चा करीत आहेत. तेथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे यांनी दिली.
अनेक उद्योजक आणि व्यावसायिक निर्माण करतील.....

ग्रामीण भागात सुरू झालेल्या या केंद्रामुळे रोजगार मिळणार आणि तोही एका प्रतिष्ठित केंद्रात. यामुळे महिलांचा उत्साह वाढत आहे. शेतावर काम करणाऱ्या महिला प्रशिक्षित होऊन उत्पादन करू लागतात. तेव्हा त्यांच्यामधील आत्मविश्वास हा द्विगुणित होऊन जातो. मूल, पोंभुर्णा तालुक्यात खऱ्या अर्थाने महिला उद्योजकांना संधी मिळणार आहे. महिलांना मिळालेली ही संधी या तालुक्यातून अनेक उद्योजक आणि व्यावसायिक निर्माण करतील यात शंका नाही.
महिलांमध्ये समाधान......

मूल आणि पोंभुर्णा या तालुक्‍यांतील ८० महिला कार्पेट निर्मिती प्रकल्पात कार्यरत आहेत. या महिलांच्या कर्तृत्वावर हा प्रकल्प प्रगतीच्या वाटेवर धावत आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या महिलेला ३०० रुपये प्रतिदिन मजुरी मिळत आहे. शेतावर राबराबूनही एवढी मजुरी मिळत नाही. मात्र, आता प्रतिष्ठेची मजुरी मिळत असल्याने महिलांमध्ये समाधान आहे. महिलाही मन लावून उत्पादन करीत असल्याने या केंद्रात तयार झालेल्या कार्पेटला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
बचतगट महिला समुदायातील आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कार्पेट क्‍लस्टर सुरू केला आहे. कार्पेट क्‍लस्टर कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योजकांच्या विकासाच्या संभाव्यतेचा शोध घेण्याबरोबर कायमस्वरूपी उत्पन्नावर स्वावलंबी होण्यास मदत करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
नरेश उगेमुगे, जिल्हा विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत