Top News

दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर. #SSCResults2021

कुठे, कसा चेक कराल? संपुर्ण माहिती एका क्लिकवर.... 


मुंबई:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल आज (16 जुलै) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. #SSCResults2021

निकाल कुठे पाहणार?

सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

वेबसाईट

http://result.mh-ssc.ac.in/

https://mahahsscboard.in/


निकाल कसा पाहाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने