महापालिकेचा भलताच थाट, महापौरांसाठी 11 लाखांची गाडी, 1111 नंबरसाठी 70 हजार रुपये खर्च. #ChandrapurMunicipalcorporation(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- ऐन कोरोना काळात चंद्रपूर महापालिकेची  उधळपट्टी समोर आली आहे. महापालिकेने महापौरांसाठी 11 लाखांची नवी गाडी खरेदी करण्यात आली. मात्र गाडी खरेदी हा मुद्दा नाही तर या गाडीच्या अतिविशिष्ट नंबरसाठी महापालिकेने RTO ला तब्बल 70 हजार रुपये दिले आहेत. भाजपच्या राखी कंचलावर या सध्या चंद्रपूरच्या महापौर आहेत. कोरोना काळात आवक कमी असताना आरोग्य सेवेवर अधिक खर्च करण्याचे निर्देश होते. मात्र जनतेच्या कराच्या पैशांची लूट झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या लुटीबाबत आवाज उचलला. 
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरांसाठी नवी अल्फा नेक्सा गाडी घेण्यात आली आहे. या गाडीला VIP नंबर मिळावा म्हणून महापालिकेने तब्बल 70 हजार रुपये RTO ला मोजल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी ही बाब समोर आणली आहे.
1111 नंबरचा आग्रह......

एप्रिल महिन्यात सुमारे 11 लाखांची ही लक्झरी गाडी महानगरपालिकेकडून खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे 1111 हा खास नंबर मिळावा म्हणून तब्बल 70 हजार रुपये पालिकेच्या वतीने RTO विभागाकडे धनादेशाद्वारे खर्च करण्यात आले.
कोरोना ऐन भरात असताना अत्यावश्यक बाबींवर पैसा खर्च करण्याऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेने नवीन गाडीची खरेदी का केली? आणि नवीन गाडीसाठी VIP नंबर मिळावा म्हणून जनतेच्या पैशाचे 70 हजार रुपये का खर्च केले? हा प्रश्न उपस्थित झालाय. सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
#ChandrapurMunicipalcorporation

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या