(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- कोरोना काळात अनेक लोकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, या गोष्टीचे भान ठेवून मुंबई येथील युथ फाॅर पिपल आणि चंद्रपूर पोलिस विभाग यांच्यातर्फे राजुरा आणि गोंडपिपरी तालुक्यातील १०० टक्के आदिवासी गावातील कुटुंबांना नुकतीच मदत देण्यात आली.
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात राजुरा उपविभागाअंतर्गत येणा-या लाठी उप पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम वामनपल्ली येथील १०५ आदिवासी बांधवांना तांदुळ, डाळ व तेल पाॅकिटचे वितरण करण्यात आले. तसेच राजुरा पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम आनंदगुडा आणि जंगुगुडा या आदिवासीबहुल गावांतील ७० ग्रामस्थांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
सदर उपक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार आणि युथ फाॅर पिपल मुंबई या संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गावातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आॅनलाईन आर्थिक फसवणुक कशी होते याबाबत जनजागृती केली. सदर उपक्रमात राजुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील झुरमुरे, लाठी उप पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड, पोलिस पाटील साईनाथ कोडापे आणि राजुरा उपविभागातील पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
#Youthforpeople