निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांना अडचणी. #Results #Difficulties

वेबसाईटच झाली क्रॅश.


मुंबई:- दहावीचा निकाल आज एकदाचा जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यमापन करून तो देण्यात आला. मात्र शिक्षण विभागाकडून देण्यात येत असलेली वेबसाईट काम करत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. लाखो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी  वेबसाईट पाहिल्याने बोर्डाची निकालाची वेबसाईट क्रॅश झाली असेल अशी शक्यता आहे. #Results #Difficulties


बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in , http://result.mh-ssc.ac.in, http://www.mahahsscboard.in या वेबसाईट्सवर पाहता येईल. मात्र या वेबसाईट 3:30 वाजेपर्यंत डाऊनच आहेत. वेबसाईट केव्हा सुरू होतील अद्याप स्पष्ट झाल नाही, डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करू नये प्रयत्न करत राहावेत. घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या