Click Here...👇👇👇

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील मुल पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या फुटाना मोकासा येथील भिमनगर वार्डातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन वाळके वय अंदाजे 35 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो अविवाहित होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही नाही. #Suicide
घटनेची माहिती मिळताच बेंबाळ पोलिस चौकीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरिता मुलं रुग्णालयात रवाना केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.