सखी महिला बचत गट कन्हाळगावची दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक. #Cheating

दोषींवर कठोर कारवाई करावी

सखी महिला बचत गट कन्हाळगाव ची मागणी

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुका हा आदिवासी दलीत शोशीत पीडीत म्हणुन ओळखला जातो कन्हाळगाव येथील सखी महिला बचत गट आहे यावर्षी नवीन कर्ज घेण्याकरिता मागील वर्षीचे दोन लाख रुपये सखी महिला बचत गटाच्या सचिव सौ मनिषा निखील उईके ला दिले व तिने लोणचे पैसे कोकन ग्रामीण बॅंक कोरपणा बँकेत भरणा केले असे सांगितले तसेच नवीन लोन घेण्यासाठी नवीन फाईल उघडावी लागेल असे सौ प्रतिभा मंगल बावणे (यांचा बॅंकेसी काहीही संबंध नाही) यांनी नविन फाईल तयार करावी लागेल म्हनुन फाईल तयार केली व विड्रालवर सह्या घेतल्या तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणून सांगितले.
 बचत गटाकडून तेराशे रुपये नगदी स्वरूपात घेतले व तुमचे पैसे मिळाले म्हणून सौ मनिषा निखिल उईके यांच्या पीशवित दाखविले तुम्ही वाटून घ्या असे सांगितले आम्ही सौ मनिषा निखिल उईके सचिव यांच्या घरी गेलो असता आज वाटतो उद्या वाटू असे बनवा बनवीचे उत्तरे मिळत होती व सौ मनीषा निखिल उईके आम्हाला रोज सांगत होती आठ ते दहा दिवसांचा कालावधी संपला आम्हाला संशय आल्यामुळे आम्ही कोकण ग्रामिण बँक कोरपना मॅनेजर साहेबांसी संपर्क साधला असता मॅनेजर साहेबांनी सांगितले तुमच्या मागील वर्षाच्या लोणचे पैसे दोन लाख रुपये भरलेली नसून तुम्हाला नवीन लोन कसे काय मिळणार असे सांगितल्यानंतर त्या महिलांच्या पायाखालची वाळू घसरली व आपण फसविल्या गेलो असे लक्षात आले आम्ही दि 16:07:2021 रोजी कोकण ग्रामिण बँक मॅनेजर,तहसीलदार साहेब,ठाणेदार साहेब,प्रकल्प समन्वयक उमेद पंचायात समिती कोरपणा यांना निवेदन दिले व योग्य चौकशी करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे तसेच दोषीं सौ मनिषा निखील उईके सखी महिला बचत गटाच्या सचिव व सौ प्रतिभा मंगल बावणे(यांचा बँकेशी काहीही संबंध नाही) यांच्या संगमताने पैसे हडप केले सखी महिला बचत गटाचे पैसे हडप करणाऱ्या दोन्ही महिलावर कडक कारवाई करण्यात यावी व आमची रक्कम आम्हाला मिळवून देण्यात यावी अशी मागणी सखी महिला बचत गट च्या सौ अनिता संजय केराम अध्यक्षा,सौ शिल्पा गजानन वाघाडे सदस्य,सौ संगीता संदीप वाघाडे सदस्य,सौ मेघा विजय वाघाडे सदस्य,श्रीमती शारदा विश्वनाथ हंसकर सदस्य,सौ माया रमेश खंडाळकर सदस्य,सौ रंजना राजू वाघाडे सदस्य,सौ विमलबाई रामदास मडावी सदस्य,सौ मंगला मनोर पार्खी सदस्य यांनी तहसीलदार ठाणेदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर पैसे न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा सदस्यांनी दिला आहे.
#Cheating

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत