दगडाने ठेचून युवकाची हत्या. #Murder

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- शेगाव येथून जवळच असलेल्या सालोरी येथे काल गुरुवार च्या मध्यरात्री एका युवकाचा दगडाने ठेचून हत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आल्याने गावात परिसरात खडबड उडाली आहे. #Murder

सविस्तर असे की सालोरी येथील युवक अमोल रामदास दडमल वय ३२ वर्ष या युवकाचा घरा लगत शेजारी या युवकाचा दगडाने ठेचून खून झाला असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. सदर ही माहिती शेगाव येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांना मिळताच घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला.
सदर या घटनेत या युवकाचा दुर्दैवी दगडाने ठेचून हत्या केल्याचे दिसून आले. परंतु हि हत्या कुणी केली? व कशासाठी? हा खून झाला हे वृत्त लीहे पर्यंत देखील अस्पष्ट होते.  तेव्हा या घटनेची अधिक चौकशी येथील sdpo श्री नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात येथील ठाणेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पो शि श्री मनोहर आमने श्री विठल वैद्य व आदी पोलीस कर्मचारी करीत आहे.