जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी केली अटक. #Accusedarrested

पत्रकारांना गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात एकजूट होण्याची गरज:- राजेश सोलापन


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली गुंडप्रवृत्तीने कमालीचे डोकेवर काढल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले असून वाढती गुन्हेगारी व गुंडप्रवृत्तीला ठेचून काढण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी चक्क पत्रकारालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. याचा तीव्र निषेध नोंदवत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत पत्रकार बांधवांच्या सुरक्षेबद्दल चर्चा करीत, वरोरा नाका चौकात घडलेला प्रकार सांगितला.
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष प्रकाश हांडे यांचेवर घडलेल्या या प्रकाराचा जिल्हाभरातून निषेध करण्यात आला, व कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवून सदर आरोपींना त्वरित अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर असे की,चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तथा ANI चे जिल्हा वार्ताहर "प्रकाश हांडे" हे १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथील वरोरा नाका चौक येथे उभे असताना पाच,सहा जणांच्या टोळक्याने एका युवकावर अचानकपणे प्राणघातक हल्ला केला.हे सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पत्रकार हांडे यांनी मोबाईल काढला असता त्यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला."आमचा व्हिडीओ जर व्हायरल झाला तर तुला कापून टाकेल" अशी जीवे मारण्याची धमकी देत ते तिथून निघून गेले.
उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रपूर शहरात गोळीबार प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा अशाप्रकारे दिवसाढवळ्या गजबजलेल्या ठिकाणी भर चौकात कुणालाही मारहाण करणे ही घटना पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी असून जिल्ह्यात आता लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारही सुरक्षित नाही असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला असून आरोपींना त्वरित अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वजा विनंती पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक विचार करावा आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.याचबरोबर अशा गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची सूचना पोलीस प्रशासनाला करावी जेणेकरून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल अशी अपेक्षा सुद्धा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.ठाणेदारांना निवेदन देतांना संघाचे अध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली यांच्यासह गौतम धोटे,गणेश लोंढे,मयुर एकरे,प्रवीण मेश्राम,प्रवीण ठाकरे या सहकारी पत्रकार बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा भरातून आलेल्या निवेदनाला जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी गंभीर दखल घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश रामनगर पोलिसांना दिले. 15 जुलै ला आरोपी तेजेश मेश्राम याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. जिल्हाभरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा उद्रेक होत असताना पत्रकारांनी सजग राहून एकजुटी दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी केले आहे.
पत्रकारांच्याया मागणीला तात्काळ प्रतिसाद देत कारवाई केल्याबद्दल ग्रामीण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कुक्कु साहनी, महासचिव पुरुषोत्तम चौधरी, उपाध्यक्ष अनिल देठे, सचिव विनोद पन्नासे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
#Accusedarrested

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत