Sanjay Raut: "चंद्रपुरात काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही!"


मुंबई:- चंद्रपूर महानगरपालिकेत महापौरपदाची निवडणूक आता रंगात आली आहे. पण या सगळ्यात संजय राऊत यांनी एक मोठं विधान करून भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलंय. "कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही," असं राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.


महापालिकेत आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडक सूचनांनंतर संजय राऊत यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय.

काय म्हणाले संजय राऊत व्हिडिओ पहा!