(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील देवलागुडा ग्रामपंचायतच्या वतीने देवलानाईक सार्वजनिक वाचनालयाला अमुल्य अश्या वस्तू भेट स्वरूपात देवलानाईक ग्रामपंचायतचे सचिव श्नी पोडे सर व सरपंच श्नी प्रेमदास राठोड यांच्या हस्ते टेबल, खुर्ची आणि कपाट प्रदान करण्यात आले.
देवलानाईक सार्वजनिक वाचनालयाचे होतकरू अभ्यासु विद्यार्थ्यांना खाली बसुन अभ्यास करावा लागत होता यामुळे विद्यार्थी पुर्ण वेळ देत नव्हते याच विचारकरून देवलागुडा ग्रामपंचायत नी देवलानाईक सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांना बसायला टेबल खुर्ची व पुस्तक ठेवायला कपाट देण्यात आले आहे या वेळी उपस्थीत देवलानाईक ग्रामपंचायतचे सचिव श्नी मा. पोडे सर सरपंच मा. प्रेमदास राठोड दत्ताभाऊ चव्हाण प्रेम राठोड कैलास जाधव विकास चव्हाण अविनाश जाधव आदींची उपस्थिती होती.
#Library
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत