गोंडपिपरी येथील शवविच्छेदन गृहाची नविन इमारतीची मागणी. #Gondpipari

Bhairav Diwase

प्रशांत येल्लेवार यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुका विस्ताराने मोठा आहे. तालुक्यात एक पोलीस स्टेशन दोन उपपोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मृतदेहाचे शवविच्छेदन गोंडपिपरी येथील शवविच्छेदन गृहात केली जाते. Gondpipari
पोंभुर्णा तालुक्यातील मृतदेहाना शवविच्छेदनासाठी गोंडपिपरीलाच आणले जाते. गोंडपिपरी येथील शवविच्छेदन गृहाची मागील काही वर्षापासून अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. येथे विद्युत पुरवठा नाही. इमारत मोडकळीस आलेली आहे. तरी सूसज्त शवविच्छेदन गृहाची इमारत मंजुरीसाठी प्रशांत येल्लेवार यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे निवेदन देत मागणी केली.