🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जागतिक सर्प दिनी सर्पमित्रांनी दिले विषारी सापाला जिवदान. #Snake(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- जागतिक सर्प दिनी विषारी सापाला पकडून जिवदान देण्याची घटना दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता येथील बगडे वाडी परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार, येथील बगडे वाडी परिसरात शहरातील स्टील बर्तनचे व्यापारी अनिल पडोळे यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू आहे. आज दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कामावरील अमित लिचोडे या मजुराला विटांच्या ढिगामध्ये नाग जातीचा विषारी साप दिसून आला. त्याने लगेच घर मालक अनिल पडोळे यांना माहिती दिली. पडोळे यांनी लगेच सर्पमित्र श्रीपाद भाकरे यांना माहिती दिली.माहिती मिळताच श्रीपाद भाकरे तात्काळ साप असलेल्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी सापाला पकडून जंगलात सोडून दिले. यावेळी अक्षय बोंडे, निमकर, शुभम सेगमवार, सुनील पडोळे, अमित लिचोडे उपस्थित होते. श्रीपाद भाकरे हे वन्यजीव प्रेमी असून उत्कृष्ट सर्पमित्र आहेत. ते मागील पाच वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्य करीत असून आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त सापांना जिवदान दिले आहे.
#Snake

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत