विज पुरवठा कापल्याने कोंढा गावाचा पाणीपुरवठा विस दिवसापासून बंद. #Electricity

माजी सरपंच गोंडे यांचा आंदोलनाचा इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा योजनेचे विज बिल न भरल्याने विज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडित करण्यात आल्याने तालुक्यातील कोंढा गावाचा पाणीपुरवठा गेल्या विस दिवसांपासून बंद पडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. हा पाणीपुरवठा येत्या चार दिवसात सुरू न करण्यात आल्यास याविरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच अविनाश गोंडे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील पाणीपुरवठा योजनेचा विजेचे बिल न भरल्यामुळे २४ जुनला विज कनेक्शन कापण्यात आली आहे. तेव्हापासून गावातील पाणीपुरवठा बंद पडलेला आहे.यामुळे दिवसभर शेतात राबुन थकून आलेल्या गावकऱ्यांना विशेषतः महिलांना घरी आल्यावर पाण्यासाठी दूरवरच्या विहिरीवर व वेळप्रसंगी जवळच्या नाल्यावर जावे लागत असल्याने त्यांना शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.पाणीपुरवठा बंद पडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरलेला आहे.हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा यासाठी माजी सरपंच अविनाश गोंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यकार्यकारी अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, ठाणेदार यांना पाठविण्यात आले असून पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे. निवेदन सादर करतांना माजी सरपंच अविनाश गोंडे, गीता प्रवीण गोंडे, सुनीता मंगाम,पांडुरंग भोयर, सूर्यभान देठे, सचिन गोरे, अमरदिप शेंडे, राजेंद्र राजूरकर, प्रदीप मांडवकर व गावकरी उपस्थित होते.
#Electricity

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत