Top News

'त्या' महिला डॉक्टरला निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करा. #Doctor

प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी पाटण प्राथमिक रुग्णालयातील प्रकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील प्रेमीलाबाई राठोड व फुलाबाई उर्फ लक्ष्मीबाई राठोड या महिलेल्या या महिला आपल्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक वारा वादळ सुरू झालं यातच त्यांच्या शेतामध्ये वीज कोसळली यामुळे या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या यांना पाटण येथील आरोग्य प्राथमिक केंद्रांमध्ये दाखल केले होते. पण एक दीड तास लुटुनी डॉक्टर हजर झाले नाही.
यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर लक्ष देत नसल्याची माहिती त्यांनी शिवसेना महिला तालुका संघटिका सिंधुताई जाधव यांना दिली त्यानंतर चंद्रपूर येथील प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे यांना सदर बाब सांगून जीवन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तेथील परिस्थिती कथन केले असता. वरिष्ठांना तक्रार दिल्याचा राग व्यक्त करीत कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर अमानुष व्यवहार करीत उपचार न करता खालच्या भाषेत शिवीगाळ केल्याची घटना दि.०७ जुलै ला दुपारी चार वाजता घडली याबाबत प्रहार पक्षाने त्या महिला डॉक्टर ला निलंबित करुन आरोग्य विभागाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
 त्या महिला डॉक्टरांनी महिला रुग्णास ला खालच्या दर्जाचा भाषेचा वापर करीत बेडवर टाकून ती महिला डॉक्टर निघून गेले हे कृती एका महिला डॉक्टरला अशोभनीय असून माणुसकी नसणाऱ्यां असा निर्देयी डॉक्टरांनी नोकरी करण्याचा काही एक अधिकार नाही. रुग्णाला मारण्यास सोडून गेल्याने सदर रुग्णाला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर या रुग्णालयात रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हलविण्यात आले आहे.
#Doctor

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने