Click Here...👇👇👇

गोर सेना तालुका अध्यक्ष पदी सतिश राठोड यांची निवड. #Selection

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- समाजासाठी सामाजिक चळवळ उभी करून समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी जी चळवळ चालू केली आहे ती म्हणजे गोर सेना ही चळवळ देशभरात काम करत असून या चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांनी प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्यात आपली शाखा स्थापन केली आहे यातच गोर सेना राष्ट्रीय दळणवळण संयोजक श्नी विनायक राठोड सर व नागपुर विभागीय संयोजक श्नी गोविंदजी पवार सर श्नी गजानन पवार सर जिल्हा संयोजक श्नी उमेश आडे श्नी प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत दिनांक १० जुलै रोजी जिवती तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी जिवती तालुका अध्यक्ष पदी श्री सतीशजी राठोड यांची निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्ष पदी सुधाकर जाधव यांची निवड जिल्हा अध्यक्ष सुभाष राठोड यांच्या हस्ते व सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


यावेळी विभागीय संयोजक श्नी जी.व्ही. पवार सर, राष्ट्रीय दळणवळण संयोजक श्नी विनायक राठोड सर, जिल्हा संयोजक श्नी उमेश आडे, प्रभाकर पवार, प्रकाश पवार, कैलास राठोड, सुनील राठोड, विकास चव्हाण,आभास राठोड रामेश्वर राठोड यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष सतिश राठोड यांच्या निवडीबद्दल अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. #Selection