Click Here...👇👇👇

जीबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करा. #Dedication #Hospital #Inauguration

Bhairav Diwase

राकेश गोलपल्लीवार यांची मागणी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील जीबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीचा बांधकाम मागील 3 वर्षा पासून लाखो रूपये खर्च करुन पूर्ण करण्यात आले. मात्र अद्याप उद्घाटन झाले नाही, जीबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एका छोट्या रूम मध्ये स्थलांतरित आहे. #Dedication #Hospital #Inauguration
पावसाळा सुरु होताच इमारत गळत असल्यामुळे अपुरी जागा असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा पत्रव्यवहार केले असतांनाही दूर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णाचे मोठे हाल होत आहे तरी योग्य निर्णय घेऊन प्रा. आ. केंद्राच्या इमारतींचे लोकार्पण सोहळा लवकर पार पडण्यात येऊन रुग्णांची व त्यातील कर्मचाऱ्यांची योग्य वेळी काम करण्यास मदत करावी व त्वरित लक्ष देऊन लोकार्पण सोहळा पार पाडावा. लोकार्पण सोहळा पार न पाडल्यास गावकरीच उद्घाटन सोहळा १५ ऑगस्ट दिनी पार पाडतील असा इशारा जीबगाव येथील ग्रा.प. सदस्य राकेश गोलपल्लीवार यांनी दिला आहे.