भद्रावती युवसेनेची निवेदनाद्वारे मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहूरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यात तथा शहरात अनेक लोक भीक मागुन आपले पोट भरीत आहे. यांच्याजवळ आधार कार्ड, ओळखपत्र, व मोबाईल नाही. कोरोना नियमाविषयी ते संपूर्णपणे उदासीन असल्याने त्यांची अद्याप कोरोना तपासणी व लसीकरण झालेले नाही.अशा अवस्थेत हे भिकारी सुपर स्प्रेडर ठरू शकतात त्यामुळे शासनाने अशा व्यक्तींना शोधुन काढून त्यांची कोरोना तपासणी करुन त्यांचे लसीकरण करून त्यांच्यापासून होणारा संमान्य धोका टाळावा अशी मागणी भद्रावती येथील युवा सेनेने येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील भिकारी शहरभर ठिकठिकाणी जाऊन भीक मागत असतात.हे भिकारी मास्क लावत नाही व कोरोना नियमांचे पालन सुद्धा करीत नाही. त्यामुळे यांच्यापासून इतरांना कोरोना प्रादुर्भावाचा धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शासनाने अशा भिकाऱ्यांना हुडकून काढून त्यांची कोरोना तपासणी करावी जे भिकारी कोरोना बांधीत आढळतील त्यांच्यावर उपचार करावा जे निगेटिव्ह असतील त्यांचे लसीकरण करावे. व त्यांना आणि इतरांना सुरक्षित ठेवावे. अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात युवा सेनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, उपशहर प्रमुख कल्याण मंडल, जिल्हा समन्वयक पप्पू सारवान, केतन चिडके, दिनेश वडगीरवार, शैलेश पारेकर, कैलास साखरकर, गजानन चव्हाण, अमन झिंगरे, गौरव नागपुरे आदी उपस्थित होते.
#Beggar