Top News

ॲड. वामनराव चटप यांच्यासह शेकडो विदर्भवाद्यांना अटक. #Arrested


विदर्भवाद्यांचे आंदोलन पोलिसांनी उधळले.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागपूर:- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि इंधन- गॅस सिलिंडर दरवाढ विरोध व कोरोना काळातील विज बिल माफी या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज मंगळवारी सकाळी पोलिसांनी उधळून लावले. आंदोलनस्थळी आलेले माजी आमदार ऍड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांच्यासह ३५ जणांना अटक केली आहे. #Arrested
विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुकारलेले हे ठिय्या आंदोलन ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत चालणार होते. काल दुपारी बारा वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच पर्यंत चालले. आज पुन्हा सकाळी १० वाजता हे आंदोलन सुरू होणार होते. यासाठी कार्यकर्त्यांचे आगमन सुरू असतानाच तहसील पोलिसांचा ताफा शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरासमोर आंदोलनस्थळी पोहोचला. पोलिसांनी भराभर कार्यकर्त्यांना पकडून व्हॅनमध्ये कोंबले. आंदोलनस्थळी लावलेले बॅनर सुद्धा पोलिसांनी फाडून टाकले, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. #Adharnewsnetwork
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक करून सरकार दडपशाही करत असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना ॲड. दीपक चटप यांनी मांडले. आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांनी मांडले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने