Top News

जागतिक आदिवासी दिनानिमित रानभाजी महोत्सव सप्ताहाची सुरुवात. #Pombhurna


कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (कृषि विभाग) पोंभुर्णा यांचा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिनांक ९/८/२०२१ ला जागतिक आदिवासी दिननिमित्य पोंभुर्णा येथील नगर पंचायत च्या प्रांगणात रानभाजी महोत्सव सप्ताह हा कृषी व्यवस्थापन यंत्रणा पोंभुर्णा मार्फत राबविण्यात आला. या रानभाज्या महोत्सवात उमेद अभियानातील विविध समुदाय संसाधन महिलानी खेडोपाड्यातून प्रवास करीत तालुका स्तरावर विविध प्रकारच्या रानभाज्या सोबत आणून महोत्सवात भाग घेतला. गाव गाड्यातील अतिशय मुबलक प्रमाणात दिसणाऱ्यां या रानभाज्या काडाच्या ओघात दुर्मिळ होत गेल्या. #Pombhurna
परंतु या महोत्सवानिमित्य आज पुन्हा या भाज्यांचा इतिहास परत ऊजेडात आण्याचे काम या कार्यक्रमाचे आयोजक कृषी विभाग पोंभुर्णा यानी केले. या कार्यक्रमास पंचायत समिती पोंभुर्णा च्या सभापती कु. अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पं.स.सदस्य विनोद भाऊ देशमुख, गंगाधर मडावी, कांग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कवडुजी कुंदावार इत्यादी उपस्थित राहुन महिलाना रानभाज्या चे महत्व समजाऊन दिले व स्वतः भाज्या खरेदी करत उपस्थित उमेद अभियानातील माहिलांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाच्या शेवटी रानभाजी महोत्स्वात उपस्थित लाभार्थी महिलाना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. #Adharnewsnetwork

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने